Indian Saree Sanskriti - (blog)
Indian Saari - Sanskriti
(English Translation of this blog is available at below)
भारतीय
संस्कृतीमध्ये
वस्त्रदालनात अगणित प्रकारची वस्त्रे आढळतात
. त्यामध्ये स्त्रिया, पुरुष, लहान मुले,
सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्रांची उपलब्धता आढळते. एकंदरीत पाहता
भारतीय संस्कृतीमध्ये इतक्या
मोठ्या प्रमाणावर वस्त्रांचे प्रकार
आढळतात की, इतके
वस्त्र-वैविध्य असणारा
जगातील भारत हा
एकमेव देश असावा.
भारतीय संस्कृती ही
अतिशय पुरातन असल्याने, अनेक
रूढी, परंपरा, पद्धती
मोठ्या प्रमाणात चालत
आलेल्या आहेत. भारतीय पुरातन
संस्कृतीमध्ये
पेहराव, ही स्त्री
आणि पुरुष यांची
ओळख होती आणि
आहे. अगदी ५०
वर्षांपूर्वीचा
काळ बघितला तरीपण
पुरुष आणि स्त्री
यांच्या पेहरावात बराच फरक असल्याचे आढळते.
भारतीय संस्कृती मध्ये
अनेक भाषा, जाती
याप्रमाणे असणारी वेगवेगळी राज्ये
त्यांच्या वेगवेगळ्या चालीरीती, त्यांचे पेहराव यामध्ये काहीसा
फरक असल्याचे आढळते.
मानवामध्ये स्त्रीला निसर्गाने सौंदर्याचे विशेष
वरदान बहाल केलेले
आहे, ते कुणीही
नाकारू शकत नाही.
भारतीय संस्कृतीमध्ये अगदी
पुरातन काळापासून स्त्री
संबंधी साहित्य, शेरोशायरी, स्त्री
विषयीचे अनेक लेख, यातून
स्त्रीच्या सौंदर्याचे अनेक दाखले देण्यात आले
आहेत. जसा नाटक
आणि सिनेमा ह्यांचा उदय
झाला, त्यामध्ये तर
स्त्री दर्शना सोबत,
पेहराव व सौंदर्य ह्यांचा अनॊखा
मिलाफ पहावयास मिळतो.
स्त्रीच्या सुंदर दिसण्यामध्ये तिच्या
पेहरावाचा सिंहाचा वाटा आहे. ह्याची
जाण स्त्रीलाही असल्याने ती
पेहरावाबाबत जास्त जागरूक झालेली
आढळते. आपल्या सामाजिक संस्कृती मध्ये
वावरत असताना आपल्या
पेहरावामुळे, आपण जास्तीत जास्त
आकर्षक दिसावे असे
नैसर्गिकरित्या
स्त्रीला वाटत असते. त्यामुळे गरीब
असो वा श्रीमंत, प्रत्येक स्त्री
आप-आपल्या कौटुंबिक, सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळून, काही
कमी जास्त वेळ
आपल्या पेहरावावर खर्च
करत असते. सण,
समारंभात आपण जास्तीत जास्त
आकर्षक दिसावे ह्याकडे स्त्रियांचा कल
दिसून येतो.
जगात साडी
हा एकमेव पेहराव
असा आहे की,
जो फक्त भारतीय
संस्कृती मध्ये आढळून येतो.
ज्यामध्ये स्त्रीचे सौंदर्य हे खऱ्या अर्थाने खुलून
दिसते. साडी हे
वस्त्र भारतीय संस्कृतिचे प्रतीक
मानले जाते. साडी
हा भारतीय स्त्रीचा राष्ट्रीय पेहराव
आहे, तिच्या भारतीयत्वाची ओळख
आहे, ह्यामध्ये कोणतेही दुमत नसावे. जवळ
जवळ भारतातील सर्व
राज्यांमध्ये साडी वेगवेगळ्या पद्धतीने नेसली
जाते. अगदी जाणत्या वयापासून ते
उतारवयापर्यंत
साडी, स्त्रीच्या पेहरावाचा अविभाज्य भाग
बनून राहिली आहे.
साडी हे अतिशय
पुरातन असे स्त्री
-वस्त्र आहे. अगदी
पुरातन काळापासून त्यात
कालपरत्वे अनेक बदल झाले
आहेत. पुरातन काळात राजेशाही पद्धत
असल्याने स्त्रीकडे, आपले सौंदर्य जपणे,
व आपली कौटुंबिक जबाबदारी (जसे
मुलांची देखभाल, स्वयंपाक वगैरे
) पार पाडणे इतकेच
काम असे. अति-प्राचीन काळी
स्त्रिया ह्या आपले शरीर
बांधेसूद असावे ह्याकडे जास्त
लक्ष देत असाव्यात कारण
त्याचे प्रतिबिंब अनेक
लेण्यांमध्ये कोरलेल्या शिल्पांमध्ये दिसून येते. ह्यामध्ये स्त्रीचे कामुक
भाव तिच्या वस्त्रामधून परावर्तित हॊताना
दिसतात. स्त्रीच्या काही वस्त्रांमध्ये अंगभर
दागिन्यांचा समावेश असल्याचेही दिसते. दागिने, माळा, हार
ह्यातून पुढे बदल होत,
साडीचा अवतार जन्माला आला.
खालील चित्रात स्त्री
हि अल्प वस्त्रात दाखवण्यात आलेली
आहे. ह्याचे कारण बहुतेक
शारीरिक सौंदर्य जपणे, नर्तन करणे, हे त्याकाळी खूप
महत्वाचे असावे.

त्यानंतर कालपरत्वे स्त्रीच्या वस्त्रात अनेक
बदल होत, साडीकडे वाटचाल
झाल्याचे दिसून येते. पुढील चित्रात हा
झालेला बदल जाणवतॊ
. जशा जशा स्त्रीच्या जबाबदाऱ्या बदलत
गेल्या, समाज बदलत
गेला, तसे तसे तिच्या
वेशभूषेत फरक होत गेला.
वरील चित्रात सुद्धा
स्त्रीने तिचा बांधेसूदपणा जपल्याचे दिसून
येते. मात्र तिच्या
वस्त्रात बदल झालेलाही जाणवते.
स्त्रीच्या वस्त्रात तिच्या शरीराच्या पुढील
व मागील भागावर
काहीसा सुटा, मोकळा
आवरणात्मक वस्त्र प्रकाराचा समावेश
झाला, ह्यालाच पुढे
आधुनिक भाषेत पदर
असे संबोधले गेले.
हाच पदर, पुढे
साहित्यिकांच्या
गळ्यातला ताईत बनला. स्त्रीच्या पदरावर
अनेक कविता, गाणी,
लेख लिहिले गेले,
जसे पदरावरती जरतारीचा मोर
नाचरा हवा, रेश्माच्या रेघांनी ,,, हात
नका लावू माझ्या
साडीला, अशी एक
ना अनेक गाणी
मराठी, हिंदी चित्रपटात लिहिली
गेली. अति प्राचीन, पुरातन
काळात असणाऱ्या भित्ती
चित्रे, तैलचित्रे , शिल्पकला यातून
दिसणाऱ्या स्त्री वेशात अनेक
बदल घडत पुढे
आधुनिक काळात दिसणारा साडीचा
पेहराव निर्माण झाला.
ऐतिहासिक काळात अनेक स्त्रिया ह्या
फक्त चूल, मूल,
स्वयंपाक, नर्तन, ह्या क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत.
अनेक स्त्रियांनी राजेशाहीत राणीची,
पत्नीची भूमिका निभावताना प्रसंगी घोडेस्वारी, गजस्वारी करून
रणांगण गाजवले, त्यावेळी स्त्रियांची वेशभूषा हि
आधी प्रमाणे फक्त
सौंदर्य प्रदर्शनापूर्ती
मर्यादित न राहता त्यात
बदल होऊन आधुनिक
पद्धतीची नऊवारी साडी उदयास
आली. अत्यंत उंची
वस्त्र, त्यावर सोने,
चांदी ह्या मौल्यवान धातूच्या धाग्यांपासून केलेले
प्रचंड नक्षीकाम , हे
त्या काळातील उच्च
घराण्यातील श्रीमंत स्त्रियांच्या
भरजरी साडीचे वैशिष्ट्य असे.
तसेच खेड्यापाड्यातील गरीब
महिला आपापल्या कुवती
प्रमाणे कमी अधिक मूल्याची साडी
परिधान करीत असत.
म्हणजेच गरीब स्त्री पासून
श्रीमंत स्त्री पर्यंत साडी
हे एकमेव वस्त्र
परिधान केले जाई.
भारतावर अनेक युद्धे, लादली
गेली, परकीय आक्रमणे झाली,
सत्ता परिवर्तन होऊनही,
मूळ भारतीय स्त्रीच्या साडी,
या पेहरावात कुठलाही बदल
झाला नाही.पुढे
इंग्रजांचा काळही गेला, नंतर
शहरे वसू लागली,
आधुनिकीकरण, सुरु झाले, भारतीय
समाजात सिनेमाचा उदय
झाला. आणि यातूनच
स्त्रीच्या पेहरावात मोठ्या प्रमाणात फॅशनचा
शिरकाव झाला. काही
अनेक मराठी ग्रामीण सिनेमातून वेगवेगळ्या पद्धतीची नऊवारी
साडी अनेक मराठी
अभिनेत्रींनीं
भूषविली. जयश्री गडकर, सुलोचना, उषा
चव्हाण, उषा किरण,
उमा अशा अनेक
अभिनेत्रींनीं
मराठी सिनेमाच्या माध्यमातून साडीला
एक वेगळीच उंची
गाठून दिली.
भारतात अनेक
विविध भाषा बोलल्या जात
असल्याने अनेक भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ
लागले. प्रामुख्याने बांगला,
पंजाबी, तामिळ, मराठी,
भोजपुरी, गुजराथी, कोकणी अशा अनेक
भाषेत चित्रपट निघू
लागले. ह्यातून अनेकविध फॅशनचे
कपडे दिसू लागले,
ह्यातून कोणत्या भाषक लोकांमध्ये कशा
प्रकारे पेहराव असतो ह्याची
माहिती लोकांना मिळू
लागली. ह्यात इतर
पोशाखांबरोबर साड्यांचे पण विविध प्रकार
दिसू लागले.
Marathi nauwaari Saree
south Indian Saree
नवनवीन फॅशन
मुळे साड्यांचे मार्केट भारतात
मोठ्या प्रमाणात रुंदावले. शालू,
बनारसी साडी, पैठणी,
सुरती, कांजीवरम, जोधपुरी अशी
अनेक प्रकारची नावे
असलेल्या साड्या स्त्री वर्गाला आकर्षित करू
लागल्या व आजही करत
आहेत. साड्या नेसण्याच्या पद्धती
एका राज्यापुरत्या मर्यादित न
राहता त्या सर्व
राज्यांमध्ये पसरल्या. साडी वेगवेगळ्या प्रकारे नेसवणे
हा आता व्यवसायाचा भाग
झाला आहे, त्याला
सार्वजनिक समारंभात खूप मागणीही आहे.
लग्न समारंभ, प्रासंगिक पार्ट्या, स्नेह
संमेलन, कॉलेज इव्हेंट अशा
अनेक सार्वजनिक कार्यक्रमातून स्त्री
वर्ग सर्वाधिक, साडी
ह्या पोशाखात दिसत
असतो. हिंदी चित्रपटातून साडीचे
प्रचंड उदात्तीकरण झाले.
अतिशय सुंदर अभिनेत्री उदयास
आल्या. अनेक अभिनेत्रींनीं साडीला
एका वेगळ्याच उंचीवर
नेऊन ठेवले. वैजयंती माला,
नूतन, वहिदा रेहमान,
मधुबाला, आशा पारेख, तनुजा,
हेमा मालिनी, मुमताज
अशा अनेक अभिनेत्रींनीं अनेक
चित्रपटांमधून
साड्या नेसून समस्त
स्त्री वर्गामध्ये साडीचे
प्रचंड आकर्षण किंवा
क्रेझ निर्माण केली.
कोणत्याही चित्रपटातील प्रसिद्ध झालेली एखाद्या डिझाईनची साडी
लगेच तयार होऊन
बाजारात त्या नावाने दिसू
लागली. त्याला अधिक
मागणीहि निर्माण झाली.
साड्यांसह ब्लाउजमध्ये विविध
प्रकारच्या फॅशन दिसून येतात.
तर एकंदरीत, वेगवेगळ्या डिझायनर ब्लाउजचा स्त्रियांच्या सुंदर
लूकमध्ये मोठा वाटा असतो.
नवीन साड्या आणि
ब्लाउजची फॅशन दररोज वाढत,
बदलत आहे. असा
हा, जगातील हा
एकमेव स्त्री पोशाख
आहे. सध्याच्या फॅशनमध्ये साडी
नेसण्याबरोबरच
शारीरिक सौंदर्य दाखविण्याचा ट्रेंड आहे. अलीकडील चित्रपटांमध्ये ते
मुक्तपणे वापरले गेले आहे
असे दिसते. त्याचे
प्रतिबिंब समाजात कमी अधिक
प्रमाणात आत्मसात होताना दिसत असते.
"परंतु हजारो वर्षाच्या काळाचे
पाठबळ असणारा साडीचा
इतिहास समस्त स्त्रीवर्ग नक्कीच
जपून ठेवेल आणि
चालू ठेवेल अशी
आशा आहे."
आपल्याला सदर
लेख आवडला असल्यास कृपया
लाईक, कंमेंट करा.
धन्यवाद
किशोर
कुलकर्णी
- Translation (Saree Sanskriti)>>>>>>>>>
In Indian culture, there are innumerable types of garments
in the wardrobe. It has different types of clothes available for women, men,
children, all. Overall, Indian culture has such a wide variety of garments that
India should be the only country in the world with such a wide variety of
garments. Since Indian culture is very ancient, many norms, traditions,
practices have been widely followed. In ancient Indian culture, dress was and
is the identity of man and woman. Even 50 years ago, there was a big difference
in the way men and women dress. In Indian culture, different states with
different languages, castes, etc., differ in their different customs and
attire.
In humans, woman is endowed with a special gift of beauty by
nature, which no one can deny. From time immemorial in Indian culture, women's
literature, sheroshiari, many articles about women, many examples of women's
beauty have been given. As drama and cinema emerged, so did the unique
combination of dress and beauty, along with femininity. Her attire contributes
a lot to a woman's beauty. As a woman is also aware of this, she seems to be
more aware about dress. Because of the way you dress in your social culture, it
is natural for a woman to want to look her best. So, rich or poor, every woman
spends more or less time on her dress, taking care of her family and social
responsibilities. At festivals, women tend to look as attractive as
possible.
The sari is the only garment in the world that is found only
in Indian culture. In which the beauty of a woman is revealed in a
real sense. The sari is considered a symbol of Indian culture. The sari is the
national dress of the Indian woman, the identity of her Indianness, there
should be no quarrel in it. Sarees are worn differently in almost all the
states of India. Sarees have been an integral part of a woman's outfit since
she was a child. A sari is a very old woman's garment. It has undergone many
changes since time immemorial. In ancient times, it was the custom of a woman
to take care of her beauty and to carry out her family responsibilities (such
as caring for children, cooking, etc.). In ancient times, women must have been
paying close attention to the shape of their bodies, as reflected in the
sculptures carved in many caves. In this, the erotic feelings of a woman are
reflected in her clothes. Some of the woman's garments also appear to include
jewelry all over her body. Jewelry, garlands, necklaces, the incarnation of the
sari was born. The picture below shows a woman in a short dress. This is
because most of the physical beauty, dancing, should be very important at that
time.
After that, many changes took place in the woman's clothes,
it is seen that she was moving towards sari. Feel the change in the next
picture. As a woman's responsibilities changed, as society changed, so did her
dress.
The picture above also shows the woman maintaining her good
looks. But she also feels that her clothes have changed. A woman's garments
consisted of a loose, loose-fitting garment on the front and back of her body,
later called the 'padar' in modern parlance. This position later became a
talisman for the writers. Many poems, songs, articles were written on the role
of a woman.
One or more songs were written in Marathi and Hindi films,
like the peacock dancing on the screen, the lines of silk, "Don't touch my
sari". Many changes have taken place in the women's attire seen from the
very ancient, ancient murals, oil paintings, sculptures, and later the sari
dress which is seen in modern times has been created. Historically, many women
have not been confined to the fields of cooking, dancing, and so on. (contd.)
While many women played the role of queen and wife in the
monarchy, they rode on horseback and rode on the Elephants back in most occasion.
At that time, women's attire was not limited to beauty pageants as before, but
the modern style of sari emerged. Extremely high-quality garments, embroidered
with precious metals such as gold and silver, were the hallmarks of the rich
women of the aristocracy of the time. Also, the poor women in the villages used
to wear more or less sari according to their ability. That is, sari was the
only garment worn from poor woman to rich woman. Many wars have been imposed on
India, foreign invasions have taken place, change of power has taken place, but
the sari of the original Indian woman has not changed. Later the time of the
British also passed, then the cities began to settle down, modernization
started, cinema emerged in the Indian society. And this led to a large influx
of fashion in women's clothing. Many Marathi actresses wore sarees of different
styles in some Marathi rural movies. Many actresses like Jayshree Gadkar,
Sulochana, Usha Chavan, Usha Kiran, Uma gave a different height to sari through
Marathi cinema.
Due to new fashions, the market for sarees has widened in India. Shalu, Banarasi saree, Paithani, Surati, Kanjivaram, Jodhpuri are some of the names that have started attracting women and are still used today. The practice of wearing sarees was not limited to one state but spread to all those states. Wearing sarees in different ways has now become a part of the business, it is also in high demand in public ceremonies.Most of the women are seen in sari at weddings, casual parties, love gatherings, college events and many other public events. There was a huge exaltation of sarees from Hindi films. Very beautiful actresses emerged. Many actresses took the sari to a different height. Vajyanti Mala, Nutan, Waheeda Rehman, Madhubala, Asha Parekh, Tanuja, Hema Malini, Mumtaz, Many such actresses wore sarees from many films and created a huge attraction or craze for sarees in the entire female class. A sari of a design famous in any film was immediately made and appeared in the market under that name. It also created more demand.
The next generation of actresses in the film like Jayaprada, Sridevi, Madhuri,
Padmini, Smita Patil, Anita Raj, Meenakshi all gave a lot of glamor to the
sari. Due to the new fashion, many new experiments were done in the production
of sarees.
Along with sarees, blouses also created a variety of fashions. So overall,
different designer blouses have a big part in the beautiful look of a woman.
The fashion of new sarees and blouses is increasing every day. With so much
variety, this is the only feminine outfit in the world. There is a trend in the
current fashion to show physical beauty along with wearing a sari. It appears
to have been used freely in recent films.
So the journey of sari, which has been going on for hundreds, thousands of
years, is not over yet. The journey of saree is still going on by adopting new
trends and fashions. Only now the children who are hiding behind the mother's
"Padars", wiping their face with the mother's Saree "Padar"
and flee away outside, are no longer seen. The covering on the face of the
lover and the husband by Saree's "Padar" is no longer visible. In
rural areas, the number of women wearing sari is still high. But in urban
areas, the use of sari is now limited to many festivals and ceremonies. Because
now the world has become so fast. Women are out of the house, doing jobs, so
there is a growing trend to wear clothes that will allow them to move around
easily. That's somewhat true.
"But it is hoped that the history of sarees, which has
a history of thousands of years, will be preserved and continued by all
women."
(If you like this my blog kindly
give likes, comments)
Thanks
Kishor Kulkarni














Comments
Post a Comment